rummyculture customer care

बंधूंनो प्रत्येक मंडळाला पोलीस स्टेशन मध्ये जाऊन गणेश उत्सवासाठी परवानगी मिळवणे हे शक्य नसते. त्यामुळे शासनाने आता प्रत्येक गणेश फेस्टिवल असो किंवा इत्यादी उत्सवासाठी आपल्याला जर परमिशन हवे असेल तर आपण घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने परमिशन हे मिळवू शकता ते कशा पद्धतीने पाहूया.

 • बंधूंनो सर्वप्रथम आपल्याला खालील वेबसाईट उघडायची आहे.

https://citizen.mahapolice.gov.in/Citizen/MH/index.aspx

 • त्यानंतर त्यामध्ये आपल्या मंडळाचा जो अध्यक्ष असेल त्याची आयडी त्यामध्ये रजिस्ट्रेशन करायची आहे.
 • यानंतर परत लॉगिन या पर्यायावर क्लिक करून आपल्याला जो आपण रजिस्ट्रेशन आयडी बनवला आहे तो तेथे लॉगिन करायचं आहे.
 • व त्यानंतर वरती आपल्याला गणेश फेस्टिवल परमिशन एप्लीकेशन असे नाव दिसेल त्यावर आपल्याला क्लिक करायचे आहे.
 • त्यानंतर आपल्यापुढे अजून एक पेज ओपन होईल.
 • परत आपल्याला तेथे जो रजिस्ट्रेशन आयडी आहे तो तिथे लॉगिन करायचा आहे लॉगिन केल्यानंतर आपल्यापुढे काही फोटो येतील.
 • व त्यानंतर वरती आपल्याला सिटीजन सर्विसेस हे ऑप्शन दिसेल त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचे आहे.
 • क्लिक केल्यानंतर तेथे आपल्याला काही लिस्ट मिळेल लिस्टमध्ये शेवटून दोन नंबरला गणेश फेस्टिवल एप्लीकेशन असा ऑप्शन असेल त्यावरती आपल्याला क्लिक करायचे आहे.
 • क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर इन्फॉर्मेशन भरण्यासाठी एक फॉर्म मिळेल त्यामध्ये आपली अचूक सविस्तर माहिती तेथे आपल्याला भरायची आहे.
 • माहिती भरल्यानंतर शेवटी सबमिट या शब्दावर क्लिक करायचे आहे
 • सबमिट या शब्दावर क्लिक केल्यानंतर तेथे आपल्याला रजिस्ट्रेशन आयडी मिळेल तो आपल्याला जपून ठेवायचा आहे व त्यानंतर प्रिंट म्हणून या शब्दावर क्लिक करायचे आहे.
 • हे प्रिंट आपण पीडीएफ चे स्वरूपात किंवा इतर माध्यमांच्या सरूपात प्रिंट करू शकता व ते आपल्या जवळील पोलीस स्टेशनमध्ये जाऊन जमा करायचा आहे.
 •  जमा केल्यानंतर आपल्याला फक्त पाच मिनिटांमध्ये त्यांच्याकडून गणेश उत्सव परवानगी हे पत्र मिळेल.

बंधूंनो, आपल्याला जर ही माहिती आवडल्यास आपल्या इतर बांधवांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही याविषयीची माहिती मिळेल.

धन्यवाद !

अधिक माहितीसाठी आमचा whatsapp  ग्रुप जॉईन करा

हे देखील वाचा

error: Content is protected !!
Scroll to Top