Mahadbt portel

शेतकरी बंधूंनो, आपल्या सर्वांना माहीतच आहे की पाणी हे जीवन आहे. पूर्वी पासूनच शेतकरी मित्र शेतामध्ये पाणी देत असताना पारंपरिक पद्धतीचा वापर करत आहेत, म्हणजे शेतांना पाठाने मोकळे पाणी सोडत आहे. अजूनही त्या पद्धतीचा अवलंब बऱ्याच ठिकाणी केला जात आहे. पण त्यामध्ये आता पाणी देण्याच्या वेगवेगळ्या पद्धती विकसित झालेले आहेत.

शाश्वत कृषी सिंचन योजना

सध्या पाणी देत असताना शेतकरी बंधू ठिंबक सिंचन चा वापर करत आहेत. या पद्धतीचा अवलंब केल्यामुळे गुणवत्ता, पूर्ण शेतमाल तयार करण्यास व उपलब्ध पाण्याची शेती करण्यास शेतकऱ्यांना हातभार लागला आहे. खरं म्हणजे ठिंबक सिंचन प्रणालीचा वापर करणे गरजेचे आहे. कारण पूर्वीसारखा पाण्याचा साठा सध्या उपलब्ध नाही.

सर्व शेतकरी बांधवांनी तुषार सिंचन व ठिंबक सिंचन याचाच वापर करावा असे सांगितले जाते. परंतु या प्रणालीचा वापर करत असताना टिंब सिंचन व तुषार सिंचन शेतामध्ये जोडण्यासाठी भरपूर खर्च येत असतो. यासाठी लागणाऱ्या पाईप्स, लेटरल, नजर स्प्रिंकलर, इत्यादी गोष्टी खर्चिक असतात. यासाठी शेतकऱ्यांकडे आर्थिक भांडवल असणे गरजेचे आहे.

सर्व शेतकरी बांधवांकडे भांडवल उपलब्ध असेल असेही नाही, त्यामुळे शासनाने शाश्वत कृषी सिंचन योजना ही सुरू केलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तुषार सिंचन व टिंब सिंचन साठी अनुदान दिले जाणार आहे.

अनुदान किती मिळणार आहे ते पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

error: Content is protected !!
Scroll to Top